ताज्या घडामोडी

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांची उपजिल्हा रुग्णालय व पंचायत समिती कार्यालयास अचानक भेट

कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची केली कानउघडनि.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक २३ सप्टेंबर २०२१ रोजी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड व पंचायत समिती कार्यालय येथे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी अचानक भेट दिल्याने अधिकारी-कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांची तारांबळ उडाली.पंचायत समितीचे कर्मचारी हजेरीपट तपासले असता २१ कर्मचारी गैरहजर आढळून आले तर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला.आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अचानक भेटीने अधिकारी कर्मचारी धास्तावले आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांची आज गुरुवार रोजी अचानक भेट देऊन रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला यावेळी रुग्णालयातील सलाईनसह इतर काही औषधांचा स्टॉक संपला असल्याची बाब समोर आल्याने वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरले रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णास आरोग्यसेवा देणे तुमचे कर्तव्य असून कर्तव्यात कसूर करणाऱ्याची गय केली जाणार नसल्याचे आमदार गुट्टे यांनी सांगितले.
यावेळी रुग्णांना भेट देऊन तब्येतीची चौकशी केली गेल्या काही दिवसापासून आ.डॉ.गुट्टे हे अचानकपणे उपजिल्हा रुग्णालयात भेट देत असल्याने रुग्णांना देण्यात येणाऱ्या रुग्ण सेवेसह भौतिक सेवेत ही सुधारणा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे तसेच पंचायत समिती येथे अचानक भेट देऊन कार्याचा आढावा घेत कर्मचारी हजेरीपटची पाहणी केली असता पंचायत समिती कार्यालयात असलेले ४१ कर्मचाऱ्यांपैकी २० कर्मचारी हजर तर २१ कर्मचारी व गटविकास अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आमदारांनी गैरहजर कर्मचाऱ्यांना फोन केला असता कर्मचाऱ्यांनी फिल्डवर असल्याचे सांगितले याची खातरजमा करण्याकरिता संबंधित गावातील नागरिकांना फोन केला असता आज पंचायत समितीचा कोणताही अधिकारी गावात आला नसल्याचे नागरिकांनी सांगितले
गैरहजर २१ कर्मचारी घरीच होते गैरहजर कर्मचाऱ्यांना आ.डॉ.गुट्टे यांनी धारेवर धरण कामाबाबत हलगर्जीपणा कधीच खपून घेतला जाणार नसून यापुढे मी कधीही आणि केव्हाही अचानक भेट देऊन तुमच्या कामाचा आढावा घेईल त्यामुळे जनतेची कामे योग्य पद्धतीने व कमी वेळात करण्याचे निर्देश आ.डॉ.गुट्टे यांनी प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close