सिरपुर तंमुसने लावला प्रेमीयुगुलाचा विवाह

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमुर तालुक्यातील सिरपुर येथे प्रेमीयुगलाचा तंटामुक्त समितीने विवाह लावुन दिला.

भिसी येथील सपना राजु मेश्राम व शिवणपायली येथील प्रविन सिंधु वाळके यांचे एकमेकांवर प्रेम जळले त्यांनी लग्न करण्याचा विचार केला पण सपना कडील घरच्यांना हे मान्य नव्हते म्हणुन दोघांनीही तंटामुक्ती समिती सिरपुर येथे रितसर अर्ज केला व कागदपत्रे देऊन विवाह लावुन देण्याची विनंती केली . त्यानुसार तंटामुक्त समिती अध्यक्ष व सदस्य यांनी कागदपत्रांची पडताळणी व इतर चौकशी करून सपना राजु मेश्राम व प्रविन सिंधु वाळके यांचे रितीरिवाजानुसार लग्न लावुन दिले.

यावेळी मा. विलासराव बोरकर (अध्यक्ष तमूस शिरपूर ),श्री मंगेशभाऊ भानारकर (पो. पा./निमंत्रक )सौ वैशालीताई निकोडे (सरपंच )श्री राजेंद्र भानारकर (उपसरपंच )श्री मनोहरजी शेंदरे -सदस्य, भगवानजी आदे सदस्य, श्री सुनिलभाऊ गेडाम(माजी अध्यक्ष तमूस )श्री दिवाकरजी डहारे (सदस्य )श्री. सुनिलजी कोसे (सदस्य /पत्रकार )
श्री. महेंद्र डेकाटे पो. पा. शिवनपायली, श्री बाळकृष्ण रामटेके (रोजगार सेवक )श्री. मंगलदास मडावी ग्रा. पं. कर्मचारी, सौ पुष्पाताई कापगते -सदस्य,सौ डहारेताई -सदस्य तसेच मुलाकडील नातेवाईक व शिरपूर येथील गावकरी उपस्थित होते.