ताज्या घडामोडी
संभाजी भिडेंना त्वरित अटक करा -चंद्रपूर माळी समाजाची मागणी

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचे विरोधात संभाजी भिडे यांनी अर्वाच्य भाषेत वक्तव्य केले. त्यामुळे माळी समाजातील भावना दुखावल्या गेल्या आहे. भिडे यांना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी चंद्रपूर माळी महासंघचे अध्यक्ष विजय चहारे यांचे नेतृत्वात आज बुधवार दि.२ऑगस्टला करण्यात आली .दरम्यान स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक व चंद्रपरचे जिल्हाधिकारी यांना या संदर्भात एक लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.निवेदन सादर करताना अरुण तिखे , विश्वास बनकर, विशाल निंबाळकर, कालिदास वाढघुरे, राहुल बनकर, वसंत चाहरे, रवी चहारे रवी गुरनूले, विजय चौधरी, सुरेश पाचपोर, विनोद राऊत, रमेश खडके आदीं महासंघचे जेष्ठ पदाधिकारी व माळी समाजातील बांधव मोठ्या संख्येंने उपस्थित होते.