शिवरक्षक जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
दिनांक 09/10/2021 छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शूरविर महापराक्रमी शिवरत्न शिवरक्षक जिवाजी महाले यांची ३८६ व्या जयंती गांधी चौक, साकोली जि. भंडारा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सहकार्याने नाभिक युवा मंच ता.शाखा साकोली व सलुन व्यवसाय संघटना साकोली/सेंदूरवाफा तर्फे साजरी करण्यात आली व शिवशौर्यास अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पूर्व विदर्भ विभाग संघटन सचिव व नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा संस्थापक अध्यक्ष शरदराव उरकुडे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ ता. शाखा साकोली चे सचिव नागेश लांजेवार,उपाध्यक्ष मोहन फुलबांधे, नाभिक युवा मंच ता. शाखा साकोली अध्यक्ष सचिन सूर्यवंशी, सलुन व्यवसाय संघटना चे कार्याध्यक्ष देवेंद्र सुर्यवंशी व सदस्य शैलेश सुर्यवंशी
आदी उपस्थित होते.