ताज्या घडामोडी

महेबुब नगर, माजलगांव मध्ये विजेचे पोल टाका नसता मशाल मोर्चा काढणार – नाजेर खूरेशी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शहरामध्ये महेबुब नगर,मनुर रोड, या ठिकाणी विजेचे खांब नाही. ह्या ठिकाणच्या नागरिकांनी आजु-
बाजु ठिकाणाहुन विज आणली आहे. परंतु हे अंतर ५०० ते ७०० फुटाचे असल्यामुळे वायर
मध्ये स्पारकिंग होत आहे. व विज बंद होत आहे. या स्पार्किंग मुळे जिवीत हानी होण्याची
शक्यता आहे. व अंतर लांब असल्यामुळे लोकांच्या घरा समोरुन वायर गेल्यामुळे भांडण-
तंडे निर्माण होत आहे. व वाद-विवाद वाढत आहे. तरी सर्व बाबींचा आपण गांर्भीयाने
विचार करुन लवकरात-लवकर विजेचे खांब टाकण्यात यावे. अन्यथा ऑल इंडिया
मजलिसे-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालय समोर दि.०१/०८/२०२२
सोमवार रोजी ठिक सायंकाळी ७ वा. मशाल मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा Aimim चे ओबीसी शहराध्यक्ष नाजेर खुरेशी यांनी दिले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close