शाहिद बांधवाना मौन श्रद्धांजली

प्रतिनिधी:सुनिल गेडाम
चिमूर तालुक्यातील नेरी पासून पाच कि मी अंतरावर असलेल्या मौजा शिरपूर येथे आज दिनांक 01/01/2025 ला गोवारी शाहिद स्मारक स्थळी सर्व गोवारी समाज बांधव एकत्र येऊन शहीद बांधवाना श्रद्धांजली अर्पण केली त्या प्रसंगी या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून मा. येसनसुरे साहेब अध्यक्ष आदिवासी गोवारी समाज संघटना वाढोणा, मा. गुरुभाऊ नेवारे मोटेगाव, मा. मंगेशभाऊ भानारकर पोलीस पाटील शिरपूर, मा. राजेंद्र भानारकर सरपंच ग्रा. पं. शिरपूर, मा. निलेशभाऊ कोसे सामाजिक कार्यकर्ते, मा. सुनिलभाऊ गेडाम अध्यक्ष वनसमिती शिरपूर, मा. सुरेशभाऊ भानारकर माजी उपसरपंच तथा अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ शिरपूर तसेच शिरपूर येथील आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष आशिषभाऊ सेंदरे, श्री. प्रेमदासजी चामलाटे श्री. किशोरभाऊ सेंदरे आणि समस्त गोवारी समाज बांधव आणि बालगोपाल उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री दिनेशदादा कामटे यांनी केले.