जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता विधानसभा क्षेत्र समिती स्थापन

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी त्याच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेची सुरवात केली.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशाने व शासनाच्या निर्णयानुसार चिमूर विधानसभा क्षेत्र समिती स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीचे अध्यक्ष विधानसभेचे आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया हे आहेत. तर सदस्यपदी सचिन आकुलवार, किशोर मुंगले, मा.तहसीलदार,गट विकास अधिकारी,बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच श्रीमती पूनम गेडाम बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेंतर्गत नागभीड भाजपा जनसंपर्क कार्यालयात मा.आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनात व सचिन आकुलवार माजी बांधकाम सभापती यांच्या नेतृत्वात आतापर्यंत 2250 महिलांची मोफत ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेली आहे.