जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आदित्य देपाळे प्रथम

जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत आदित्य देपाळे प्रथम
विभागीय स्पर्धेसाठी निवड
रेणाखळी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
शालेय क्रीडा स्पर्धेंतरगत परभणी येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत रेणाखळी जि.प.शाळेचा सातवीचा विद्यार्थी आदित्य बळीराम देपाळे हा प्रथम आला आहे आज दिनांक 13/09/2023 रोजी शाळा व्यवस्थापन समिती व शालेय शिक्षकवृंद यांच्या मार्फत चि.आदित्य व त्याचे पालक श्री. बळीराम देपाळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उद्धव इंगळे, सदस्य परमेश्वर हारकळ, राहुल ठेंगे, ग्रामपंचायत सदस्य शे इमरोज ,बालासाहेब देपाळे, बळीराम देपाळे मुख्याध्यापक तांबुळे, पवार सर, कांबळे सर, साबळे मॅडम, तुरे, मामीलवाड, गाढवे, एडके, भामरे, बाबळे, शेख अन्वर आदी शिक्षकांनी आदित्य देपाळे यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
आदित्य ची महाराष्ट्र शासन मार्फत घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा मार्फत विभागीय स्पर्धा साठी ( औरंगाबाद विभाग) या साठी निवड झाली . आदित्य आता परभणी जिल्हाचे प्रतिनिधित्व करणार आहे
यापूर्वी आदित्य शनिवार दिनांक 09/09/2023 रोजी पाथरी तालुकास्तरीय स्पर्धा 14 वर्ष आतील 41 किलो खालील वजनी गटातील कुस्ती (फ्री स्टाईल) या गटात प्रथम आला
दिनांक 12/09/2023 रोजी जिल्हा स्तरावरील स्पर्धेत याच गटात खेळून 9 तालुक्यांतील स्पर्धकांमध्ये अधिक गुण घेऊन विभागीय स्पर्धा साठी पात्रता सिद्ध केली त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुढील विभागीय स्पर्धा 20/09/2023 रोजी होणार आहे
व राज्य स्पर्धा 23/09/2023 रोजी होणार आहे चि.आदित्य बळीराम देपाळेची कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आला त्या बद्दल त्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचेवतीने सत्कार करण्यात आला