ताज्या घडामोडी

सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला परभणी शहरात 59 दिवस झाले असून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहणार आहेत यात 20 जानेवारी पर्यंत साखळी उपोषणे सुरू राहून पुढील आदेश येतील त्याप्रमाणे पुढचे नियोजन केले जाईल असे सकाळ मराठा समाज परभणी जिल्हाच्या वतीने आज 25 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करून मुंबईला जाण्यासाठी सर्व तयारी करावी असे अहवाल यावेळी करण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, सेलू, जिंतूर या शहरासह ग्रामीण भागात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून साखळी उपोषण आंदोलन सुरू आहेत. परभणी शहरात 27 ऑक्टोबर 2023 पासून साखळी उपोषण सुरू असून या आंदोलनाचा आजचा 59 वा दिवस आहे. आज उपस्थित सर्व सकळ मराठा समाज बांधवांच्या वतीने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलने सुरूच राहतील यात 20 जानेवारी 2023 पर्यंत साखळी उपोषणे करत पुढील जो आदेश येईल त्याप्रमाणे नियोजन केले जाईल असे ठरवत मराठा समाज बांधवांनी मुंबई येथे सुरू करण्यात येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट म्हणून बहुसंख्य समाज बांधवांना जायचं आहे त्याची तयारी करण्यात यावी असे अहवाल यावेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close