परभणी शहरातील बिल्डिंग रोड वर असलेले अनाधिकृत होर्डिंग तात्काळ हटविण्यात यावेत

सर्व बोर्डिंग ची स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे संभाजी ब्रिगेड ची मागणी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक मोठमोठ्या बिल्डिंग वर उड्डाण पुलावर अनाधिकृतपणे मोठ-मोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहे हे सर्व होर्डिंग अनधिकृतपणे उभे करण्यात आलेले आहेत त्यामुळे हे होर्डिंग तात्काळ हटवण्यात यावेत

आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग पडून पाच ते सहा जण मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि 50 ते 60 जण जखमी झालेले आहेत अशी घटना परभणी मध्ये सुद्धा होऊ शकते त्यामुळे परभणी जिल्ह्यातील व शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढे काही अनाधिकृत होर्डिंग्स बिल्डिंग वर लावलेले आहेत व खाली रस्त्यावर लावलेले आहेत ते तात्काळ हटवण्यात यावे व त्या सर्व होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशा घटना परभणीत सुद्धा होऊ शकतात पावसाचे सध्या अवकाळी पाऊस वादळ वारा सुटत आहे त्यामुळे अशा घटना परभणी मध्ये होऊ शकतात बऱ्याच रहदारीच्या ठिकाणी या मोठमोठ्या होर्डिंग बिल्डिंग वर उभे केलेले आहेत कोणतीही परवानगी न घेता फक्त टॅक्स भरून ह्या अनाधिकृतपणे अनेक बिल्डिंग वर उभ्या करण्यात आलेले आहेत लवकरात लवकर या सर्व होर्डिंग्स सर्व बिल्डिंग वरील काढून टाकण्यात याव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने महानगरपालिका कार्यालयासमोर यासंदर्भात तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिली आहेत यावेळी सोबत जिल्हा प्रमुख बालाजी मोहिते, नितीन जाधव, रमेश देशमुख गोविंद इककर ,राजकुमार टाक होते.