ताज्या घडामोडी

भव्य नेत्रतपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न

ग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्र कामडी नेरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह मेन रोड नेरी येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग चंद्रपूर आणि अवंती आर्टिकल्स चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने नेत्रतपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनोज मामिडवार(जिल्हा परिषद सदस्य) यांचे शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लता पिसे (सभापती पंचायत समिती चिमूर), रेखा पिसे (सरपंचा ग्रामपंचायत नेरी), यशवंत वाघे (माजी सरपंच नेरी), राजू पिसे होते.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि अवंती आर्टिकल्स चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरी येथे नेत्र नेत्रतपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची जनजागृती प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी तील सर्व कर्मचारी, आशा वर्कर, गट प्रर्वतिका यांनी व्यापक जनजागृती केली. या शिबिरात एकूण 548 लाभार्थ्यांची नेत्रतपासणी व चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश मंगर, डॉक्टर चेतन धोंगरे, डॉक्टर सतीश वाघे, डॉक्टर प्रीती वाघे, आरोग्य सेवक राठोड, निखाडे, वाघ, छाया राठोड तसेच सर्व कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close