ताज्या घडामोडी

श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

पर्यावरण पुरक गणेश मुर्ती ऑनलाइन कार्यशाळेचे उदघाटन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव- डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तथा शिक्षक दिन येथील श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात सेवा है यज्ञकुंड या सांघिक पद्याने , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच गणेश पूजन करून ऑनलाइन गणेश मुर्ती कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे तर प्रमुख अतिथी शिवहरी गिरी तसेच व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, पर्यवेक्षक उमेश थाटकर, मिलिंद वेडे, रविंद्र खोडवे आदि उपस्थित होते.
यावेळी शिवहरी गिरी यांनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनादर्श उपस्थितांसमोर मांडला. तसेच मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावर्षी विद्यालयातील सेवानिवृत्त झालेल्या व माजलगावात स्थायिक असलेल्या सर्व शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करुन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्याचा आगळा वेगळ्या पध्दतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. वैयक्तिक पद्य ‘जनसेवा ही ईश्वर भक्ती’ घेण्यात आले.या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना अमरनाथ खुर्पे यांनी शिक्षकांची कर्तव्ये, श्रध्दा व निष्ठा याविषयी सविस्तर माहिती देऊन, शिक्षक हा समाज निर्मितीचा अभियंता आहे.
प्रतिवर्षी पर्यावरण पूरक गणेश मुर्ती कार्यशाळा संपन्न होत असते, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही कार्यशाळा ऑनलाइन घेतली जात आहे. यामाध्यमातून शेकडो विद्यार्थी मातीपासून गणेश मुर्ती तयार करून तिची स्थापना गणेशोत्सवात करुन घरोघरी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला जातो. या कार्यशाळेचे हे १३ वे वर्ष आहे. हा उपक्रम विद्यालयातील कला विभागाच्या वतीने राबविण्यात येतो, या उपक्रमात कलाशिक्षक उध्दवराव विभूते, नवनाथ सांगुळे यांचा पुढाकार असतो ही कार्यशाळा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सत्यभामा मोरे , सांघिक पद्य श्रीमती किशोरी कुलकर्णी, वैयक्तिक पद्य चैतन्य आहेर यांनी सांगितले, आभार व सुत्रसंचालन शिवशंकर भंडारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close