ताज्या घडामोडी

नगर परिषद च्या कचरा गाडीवर वाजणाऱ्या हिंदी गाण्यांच्या विरोधात मनसे चे निवेदन.मातृभाषेत वाजवा, मराठी च्या सन्मानार्थ मनसे मैदानात

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शहरातील घराघरातुन कचरा गोळा करण्यासाठी असलेल्या कचरा गाडीवर हिंदी गाणे वाजवून कचरा गोळा केला जातो .महाराष्ट्र राजभाषा अधिनियमान्वये सर्व शासकीय कार्यालयात तसेच सर्व कामकाजात मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक असताना मराठी भाषेची गळचेपी होत आहे. मराठी मध्ये स्वच्छतेसाठी जागरुक करणारे गाणे उपलब्ध असताना देखील हिंदी भाषेतच गाणे का वाजविले जाते असा प्रश्न मनसे नी उपस्थित केला.हिंदी ही महाराष्ट्राची मातृभाषा नाही तसेच परकीय भाषेला लादून देण्याचे कार्य सहन करणार नाही या भूमिकेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा च्या वतीने तालुकाध्यक्ष वैभव डहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी भोयर साहेब ,नगर परिषद वरोरा यांना निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार यावर लवकरच बदल करू असे तोंडी आश्वासन मुख्याधिकारी ,नगर परिषद ,वरोरा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष वैभव डहाने ,तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी ,तालुका सचिव कल्पक ढोरे ,शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार ,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अभिजित अष्टकार ,व मराठी एकीकरण समितीचे संकेत कायरकर हे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close