ग्राहक संरक्षण मंत्री मा. श्री. छगनरावजी भुजबळ यांची राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. श्री. छगनरावजी भुजबळ यांची मुंबईत शासकीय ‘ रामटेक ‘ बंगल्यावर आज दुपारी राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
पदाधिकार्यांनी ‘ मुख्यमंत्री सहायता निधी’ चा धनादेश मा. मंत्री महोदयांकडे सुपूर्द केला.
लगेचच, साप्ताहिक कॅबिनेट मिटींग असल्याने मा. भुजबळ साहेबांशी आपल्या अडचणींं संदर्भात चर्चा होऊ शकली नाही.
अर्थात , संघटनेने यापुर्वी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत मंत्रालयातील ( मा. भुजबळ साहेबांचे स्वीय सहायक) श्री. परदेशी साहेबांशी चर्चा झाली आहे.
यासंदर्भात लवकरच उच्चस्तरीय अधिकार्यांशी चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येईल असे आश्वासन श्री. परदेशी साहेबांनी दिले आहे.
याप्रसंगी अध्यक्ष श्री. विनोद कदम, सचिव श्री. हेमंतजी अटाळकर, कार्यकारिणी सदस्य श्री. अश्फाक भाई, श्री. सुरेशदादा सपकाळ, सहसचिव श्री. संतोष व्यवहारे आणि कोषाध्यक्ष श्री. सुनील डी. जाधव परभणी जिल्हा अध्यक्ष अहमद अन्सारी उपस्थित होते.
राज्यमंत्री मा. बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सहायक श्री. गौरव जाधव यांचे या कामात विशेष सहकार्य मिळाले.