तब्बल 20 वर्षानंतर रंगला माजी विद्यार्थ्यांकडून “मैत्रीचा स्नेहमिलन सोहळा “

आदर्श जनता विद्यालयात भरली रविवारी शाळा,
सेवानिवृत्त शिक्षकांनी व माजी विद्यार्थ्यांनी अनुभवले जुने क्षण

मुख्य संपादकःकु.समिधा भैसारे
आदर्श जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज भिसी येथे सन 2004 च्या 10 वी व 2006 च्या 12 वी च्या बॅच ने 2 फरवरी 2025 रोजी “मैत्रीचा स्नेह मिलन सोहळा ” आयोजित करून भिसी शहरात पहिल्यांदाच या उपक्रमाची सुरुवात केली.
या उपक्रमाच्या यशस्वी ते साठी या विद्यार्थ्यांनी 2 महिन्यापासून खूप मेहनत घेतली.
सर्वप्रथम सर्वांनी हा कार्यक्रम घ्यायचा परंतु आपण ज्या शाळेत शिकलो त्याचं शाळेत, त्याचं वर्गात, त्याचं शिक्षकांच्या उपस्थितीत घ्यायचा असे ठरवून सर्वानुमते 2 फरवरी ही तारीख फिक्स केली.
2 तारखेचे नियोजन घेऊन सर्वप्रथम शाळेची भेट घेतली व त्यांना उपक्रमाबद्दल माहिती दिली. शाळेतील सर्व शिक्षकांना ही संकल्पना आवडली व त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला शाळेतच घेण्याची, त्याचं वर्गात घेण्याची व सर्व परीने मदत करण्याची परवानगी दिली.

त्यानुसार या बॅच ने निमंत्रण पत्रिका छापून आपल्याला शिकवित असलेल्या सर्व शिक्षकांसोबत संवाद साधला व कार्यक्रमाची माहिती देऊन,प्रत्यक्ष भेटून त्यांना आमंत्रित केले.
सर्व शिक्षकांनी त्यांना आम्ही अवश्य येणार अशी ग्वाही दिली..
या बॅच मधील काही मुले /मुली बाहेर जिल्यात नोकरीं करतात त्या सर्वांना सुद्धा आमंत्रीत करण्यात आले.
तेव्हा पासून ही बॅच या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी धावपळ करू लागली व अखेर तो दिवस आला.
या सोहळ्याची यशस्वीता टप्प्या टप्प्याने करण्यात आली.
म्हणजे
1)शाळेची बेल 2)प्रार्थना 3)परिपाठ 4)हजेरी 5)दिपप्रज्वलन 6)स्वागत,सत्कार, सन्मानचिन्ह 7) विद्यार्थ्यांचा परिचय,
8) शिक्षकाचे मनोगत
9)सर्वांचं आभार
10)भोजन आनंद अश्या प्रकारे..
सर्वांनी आपापले शालेय जीवनातील अनुभव सांगितले कसे शिकले व मोठे झाले व शिक्षकांसोबतचे क्षण आठवून जुन्या आठवणीन्ना उजाळा दिला.
प्रमुख पाहुणे म्हणजे शिक्षक गण मा. गिरडकर सर, शिरभय्ये सर, मा. बोरकर सर, मा. थुल मॅडम, मा.नवखरे मॅडम शाळेचे मुख्याध्यापक मा. उगे सर, मोहरकर सर, व शाळेचे शिपाई मुंगले यांनी आपले शालेय जीवन व विद्यार्थ्यासोबतचे क्षण सांगून “जुन्या आठवणी ताज्या केल्या” “कोणी हसले, कोणी रडले”.. पण हा दिवस अविस्मरणीय झाला.

अध्यक्ष म्हणजे जेष्ठ शिक्षक मा. खाटीकवार सर यांनी मार्गदर्शन केले. या सर्वांना बेस्ट टीचर चे सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. मैत्रीच्या सोहळा घडवून आणणारे सर्व 35 माजी विद्यार्थ्यांना “फ्रेंड्स फॉरेव्हर “हा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. “त्यावेळेसचे क्षण म्हणजे आनंदी आनंद गड जिकडे तिकडे चोहीकडे”..या बॅच कडून सर्व उपस्थित पाहुण्यांचे म्हणजेच शिक्षकांचे आभार माणण्यात आले. व कार्यक्रम कामाची सांगता भोजनाच्या आनंदाने करण्यात आली.
यानंतर सर्वांचे “ग्रुप फोटो विथ ट्रॉफी ” यामधून एकतेचा संदेश मैत्रीचा संदेश देऊन, आपले सुख दुःख एकमेकाजवळ सांगून व पुन्हा भेटू व ही मैत्री अशीच ठेऊ असा संदेश देत या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
“मैत्री म्हणजे एक आधार, एक विस्वास, एक आपुलकी, व एक अनमोल साथ….”
या सुविचारांने रविवारची शाळा गजबजून गेली व शाळा मैत्रीच्या सोहळ्या नान्हून निघाली….

मैत्रीच्या सोहळ्याचे पाहुण्याकडून म्हणजेच शिक्षकांकडून, परिसरातील आमंत्रित मंडळीकडून, भिसीवाशीय जनतेकडून, कौतुक केले जात आहे.
या बॅच चा हा सोहळा पाहून इतर बॅच सुद्धा असा सोहळा साजरा करतील यात काही शंका नाही असे उदगार भिसीच्या कानकोपऱ्यात चालू आहे.

“हा क्षण म्हणजे आमच्या शैक्षणिक क्षेत्रातील अविस्मरणीय क्षण कारण आम्ही ज्यांना शिकविले व ते घडले,त्यांनी आम्हाला ” मैत्रीचा स्नेह संमेलन सोहळा” मधे गौरवचिन्ह, मान सन्मान देऊन सन्मानित केले. आम्ही असे गुणवंत विद्यार्थी घडविले हीच आमची खरी आयुष्यातील कमाई…”
:-सर्व शिक्षकगण व मुख्याध्यापक