ताज्या घडामोडी

शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे आदर्श शिक्षक व आदर्श शाळा गौरव समारंभ सपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक 12 संप्टेंबर 2022 सोमवार रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणीच्या वतीने शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे पाथरी तालुक्यातील उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार व आदर्श शाळा व स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त, आदर्श शिक्षक व आदर्श शाळा गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमा प्रसंगी
सौ.भावनाताई नखाते मा.उपाध्यक्षा जिल्हापरिषद परभणी तथा सचिव वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी,
यांनी मार्गदर्शन करून पुरष्कार प्राप्त यांचे अभिनंदन केले, या प्रंसगी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मा.श्री. दिलीपराव हिबारे,पं स.पाथरीचे गटशिक्षणाधिकारी श्री मुकेशजी राठोड, लोणी चे सरपंच मा.श्री शामराव धर्मे,लोणीचे शिक्षण तज्ञ मां.श्री माऊली धर्मे,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.प्रल्हाद चोरमारे श्री बी.के. काकडे सर उपस्थित होते तसेच उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त जि.प.अंतरराष्ट्रीय शाळा माळीवाडा चे प्राथमिक पदवीधर शिक्षक श्री सोमनाथ डोंगरे सर व सौ. अस्मिताताई डोंगरे,स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त मा. व उच्च मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री शामराव शिंदे व आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त व स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त जि. प.प्राथमिक शाळा लोणीचे शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री रामभाऊ सौंदडे व मु. अ.नेताजी वागाळे विषय तज्ञ श्री रखमाजी कावळे सर मुख्यापक श्री डहाळे के.एन. ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close