ताज्या घडामोडी

गोंडपीपरी येथील इसमाचा अपघाती मृत्यू

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपीपरी येथील 40 वर्षीय इसमाचा दि.10 ऑक्टोबर रोज रवीवारला आक्सापूर लगतच्या हुनमान मंदिराजवळ असलेल्या वळणावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. विस्तारि इटकलवार वय 40 वर्ष पंचशील वार्ड गोंडपीपरी असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवारला आमदार सुभाष धोटे यांचा वाढदिवस होता दुपारी तीन वाजता ते गोंडपिंपरी येथे येणार होते त्यांच्याकडे मादगी समाजभवनासाठी जागेची मागणी करण्यासंदर्भात तो निवेदन देण्याच्या तयारीत होता मात्र अचानक आमदाराचा दौरा रद्द झाला त्यामुळे विस्तारी पुढील कामाला लागला . कामासाठी तो कोठारी मार्गाने गेला होता काम करून परत येत असताना गोंडपीपरी तालुक्यातील आक्सापुर च्या हनुमान मंदिरालगतच्या वळणावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघात होताच भ्रमणध्वनीवरून घरच्यांना आपला अपघात झाल्याची माहिती दिली. बोलताना अचानक आवाज येणे बंद झाले.त्याचा भ्रम्हणध्वनी सुरू होता मात्र घरच्यांना काहीच आवाज येत नव्हता कारण त्याचा मृत्यू झाला होता काही वेळातच नातेवाईक व मित्रमंडळी घटनास्थळावर दाखल झाले आणि त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. समाजासाठी धडपडणारा चाळीस वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यूने गोंडपीपरी सह तालुक्यात हळहळ व्यक्त केली .
तो बस -स्थानक गोंडपीपरी येथे चणे, फुटाणे विकण्याचे
काम करत होता तसेच तो मादगी समाज संघटनेच तालुकाध्यक्ष होता.
त्याच्या अपघाती निधनाने इटकलवार कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close