तीन दिवसात 15 शेळ्यांचा साथीच्या रोगाने मृत्यू

तब्बल एक लाख पन्नास हजाराचे नुकसान.
अपत्तीग्रस्ताला तात्काळ मदत द्या शुभम मंडपे यांची मागणी.
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
चिचाळा (शास्त्री) येथील बुधाराम तातोबा सुखदेवें यांच्या तीन दिवसांमध्ये 15 शेळ्यांचा साथीच्या रोगाने मृत्यू झाला आहे व तब्बल एक लाख पन्नास हजाराचे (150,000)नुकसान झालं आहे यामध्ये दहा शेळ्या व तीन बोकड व दोन पाटांचा समावेश आहे , सध्या चंद्रपुर जिल्ह्यामध्ये व चिमूर तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर हतबल झाला आहे व चिमूर तालुक्यात सतत आलेल्या 20 दिवसाच्या पावसाने अनेक साथीचे रोग पाळीव जनावरांवर ग्रासले आहेत अशातच चिंचाळा (शास्त्री) येथील अपत्तीग्रस्त बुधाराम तातोबा सुखदेवे यांच्यावर तीन दिवसात 15 शेळ्यांच्या मृत्यूने खूप मोठं संकट कोसळले आहे यामुळे समाज कार्यात अग्रेसर असणारे , आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व वंचित बहुजन युवा आघाडी चे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष शुभम भाऊ मंडपे यांची अपत्तीग्रस्त पीडिताला प्रशासनाने तात्काळ मदत घ्यावी अशी मागणी केली आहे व या प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलनही करू असा इशारा दिला आहे व संपूर्ण चिमूर तालुक्यात पी.पी.आर व निमोनियाच्या लसीकरणाची शिबिरे प्रशासनाने व पशु वैदकीय विभागाने राबवावी अशे आव्हान केले आहे व मौजा चिंचाळा (शास्त्री) येथील आपत्तीग्रस्त बुधाराम तातोबा सुखदेवें यांना प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे
यावेळी या प्रकरणाची माहिती मिळाली असता आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य शुभम भाऊ मंडपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन आपत्तीग्रस्तांची भेट घेतली व तात्काळ तालुका पशु वैदकीय अधिकारी जांभुळे सर व पशु वैदकीय अधिकारी देशमुख मॅडम शंकरपूर यांना कळविण्यात आले त्यांनी तात्काळ येऊन मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आले व याची माहिती स्थानिक तलाठी दोडके मॅडम यांनाही कळविण्यात आले , यावेळी या शेळ्यांचा मृत्यू हा पी.पी.आर. व निमोनिया या रोगाने झाला आहे असा अंदाज पशु वैदकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे
यावेळी घटनास्थळी पशु वैदकीय अधिकारी जांभुळे सर व देशमुख मॅडम शंकरपूर ,निलेश धानोरे पशुवैदकीय अधीकारी शंकरपूर,व अपत्तीग्रस्त बुदाराम सुखदेवें व आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य शुभम मंडपे व सामाजिक कार्यकर्ते मनोज सरदार , मधूकरजी नागपुरे , सुधाकरजी राऊत , प्रकाश भषारकर ,विवेक मुन , सुमेध मुन , बालकदास सुखदेवें व आदी उपस्तीत होते
प्रतिक्रीया:अतिवृष्टीमुळे जनावरांवर साथीच्या रोगामुळे 15 शेळ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे बुधारामजी सुखदेवें यांना प्रशासनाने तात्काळ मदत घोषित करावी व संपूर्ण चिमूर तालुक्यातील गावागावात मदत व उपाययोजना जाहीर कराव्यात
शुभम मंडपे ग्राम पंचायत सदस्य आंबोली