ताज्या घडामोडी

सोनी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत किसान एकता पॅनल विजयी

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील विविध सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका रविवारी (ता १०) घेण्यात आल्या.या निवडणुकीत किसान एकता पॅनल व परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी भाग घेतला होता.या निर्णायक निवडणुकीत किसान एकता पॅनलने बाजी मारत परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना पराभूत केले आहे .
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार डोमाजी बोपचे, आत्माराम चव्हाण,चुन्नीलाल रहांगडाले,लोकचंद पटले,धनलाल बोपचे,यादोराव टेंभरे,लिखीराम पटले, हिरालाल रहांगडाले,योगराज रहांगडाले, प्रमिला पुंडे, कांताबाई कोन्हे,नरहरी मेश्राम, यशवंत नेवारे यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत किसान एकता पॅनलला विजयी करण्यासाठी भुमेश्वर चव्हाण,काशीराम पटले,धनलाल बोपचे,टेकेश्वर पारधी,जीवीत पुंडे,चुन्नीलाल हरिणखेडे,गोवर्धन पटले, डॉ बुधराम बोपचे,सुरजलाल टेंभरे,साहेबलाल पटले,तिलकचंद पटले, जगदिश पटले,खेमराज टेंभरे,भुमेश्वर ठाकरे,सोनाराम येळे, नारायण ठाकरे,हरिचंद कोल्हे व सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close