ताज्या घडामोडी

शनिवारी पाथरीत हभप इंदोरीकर महाराजांचे किर्तन

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

ज्यांना निराधाराचे आधार म्हणून संबोधले जाते ते समाजसेवी डॉ जगदिश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त पाथरी शहरातील परभणी कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या अंजली मंगल कार्यालयात शनिवार २८ ऑगष्ट रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
या निमित्त कृष्णकथा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त कथाकार श्री ह भ प बंडू महाराज धर्मे यांचे दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत कृष्णकथेचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७ वाजता ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे समाजप्रबोधन पर किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. भाविक भक्तांनी या हरीप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ जगदिश शिंदे आणि मित्र परिवाराने केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close