ताज्या घडामोडी

११२ क्रमांकावर चुकीची माहिती देणार्यावर गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

मानवत तालुक्यातील रामपुरी येथील एक व्यक्तीनी टोल फ्री क्रमांक ११२ या क्रमांकावर चुकीची माहिती दिल्या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाइक नरेंद्र काबळे याच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आले…..सविस्तर वर्त अशी की मानवत तालुक्यातील रामपूर येथील एका व्यक्तीने 112 टोल फ्री क्रमांकावर फोन केला व त्याने सांगितले की मला तीन व्यक्ती जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहे मी माझ्या घरामध्ये लपून बसलो आहे मला मदत करा असे सांगितल्यावर पोलीस नाईक नरेंद्र कांबळे व इंगळे यांच्या पथकाने गावातल्या व्यक्तीला घेऊन तक्रारदाराचे घर गाठून तक्रारदाराच्या पत्नीशी चौकशी केली असता त्यांच्या पत्नीने सांगितले की माझे पती आता जेवण करून बाहेर गेले आहेत व माझ्या घरी अशी कोणती घटना घडलेली नाही ज्या व्यक्तीने मोबाईल वरून 112 या क्रमांकावर फोन केला होता तो मोबाईल क्रमांक बंद होतं 112 क्रमांक खोटी माहिती दिल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर नरेंद्र कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करीत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close