जीविका इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथे जीविका इंग्लिश मीडियम स्कूल जुनियर कॉलेज वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला.
विद्यार्थ्यांनी नियोजपूर्वक अभ्यासात सदैव सातत्य ठेवल्याने यश पदरी पडतेच अभ्यासात सातत्य ठेवा, तेव्हाच आपल्याला यशाच्या जवळ पोहोचता येते .माणसाला पराजय सुद्धा पचवता येणे गरजेचे आहे. आयुष्यात जय पराजय हे येतच असतात , त्याला प्रत्येकाने सामोरे गेलेच पाहिजे.

अपयश ही यशाची पहिली पायरी त्यामुळे मनन चिंतन करून ध्येय निश्चित करा व सातत्याने त्याचा पाठलाग करा यश नक्की मिळतेच एवढेच नव्हे तर तुम्ही ज्या इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकला त्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी तुम्हाला घडविले ,ज्या आई-वडिलांनी संस्कार करून, पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला ज्या चांगल्या शाळेत शिकविले त्यांना विसरू नका. खूप मोठे व्हा व आई-वडिलांचे, शाळेचे नाव मोठे करा.
असे प्रतिपादन त्यांनी केले ते यशोदा यशोदा बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित जीविका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वर्ग १० वी च्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाला मंचावर अध्यक्ष म्हणून आंबेरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ताराचंद रामटेके सर .
प्रमुख पाहुणे म्हणून वैभव ठाकरे (उपसरपंच ग्रामपंचायत आंबोली.) अमोल पवार (पोलीस स्टेशन भिसी)
श्री साई कॉन्व्हेन्ट च्या मुख्याध्यापिका शुभांगी आष्टणकर,शाळेचे मुख्याध्यापक हर्षित उपाध्याय ,
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शुभम लोणारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक किशोर आष्टणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अभ्यासात सातत्य व सद्गुण अंगी बाळगले तर यश निश्चितच पदरात पडते. त्यामुळे कुठेही घाबरून न जाता परीक्षेला आत्मविश्वासाने समोर जा, यश तुमच्या पदरात नक्की पडतेच .
कार्यक्रमाचे अध्यक्ष ताराचंद रामटेके यांनी जीवनात अनेक अडथळे येतात त्याकडे लक्ष देऊ नका विद्यार्थ्यांनी उंच ध्येय गाठा परंतु ज्या शाळांनी तुम्हाला घडविले त्या शाळेला विसरू नका. शिक्षकांशी नेहमी सबंध ठेवा आपल्याला आवडणारे क्षेत्रामध्ये करिअर करा चांगले नागरिक बना असा सल्ला दिला यावेळी १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेबद्दल व शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता वैभव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन कठीणातल्या कठीण प्रसंगावर कशी मात करता येईल हे सांगितले जीवनातील एखाद्या प्रसंगाने माणसाचे जीवनच बदलून जाते व उंच यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचता येते हे पटवून दिले कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी व त्यासाठी करावयाचे नियोजन आणि परीक्षेला समोर जाण्यासाठी महत्त्वाचे टिप्स देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषभ शिवरकर यांनी तर सूत्रसंचालन वर्ग ९ वी ची विद्यार्थीनी कू गुंजन गोहणे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी यशस्वी गोहने यांनी केले कार्यक्रमाला प्रा. शुभम लोणारे , प्रा. तुषार बुचे , राखी खेडकर मॅडम अमृता देवतळे मॅडम, अपूर्वा राजूरकर, सौ. लता सातपुते तसेच शाळेतील सर्व प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले .