ताज्या घडामोडी

म्होपरे येथे जमिनीच्या वादातून खून

खुन करून पळून गेलेल्या चार आरोपींना दोन तासात केले अटक..

खूनाचा गुन्हा दोन तासात उघड..

कराड तालुका डीबी पथकाची कामगिरी..

उपसंपादकःविशाल इन्दोरकर

दिनांक 27 रोजी दिलीप संकपाळ हे म्होपरे गावात त्यांच्या घराच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये काम करत असताना त्यांचा व त्यांचे भाऊ रमेश संकपाळ यांचा जमीन वाटपाबाबत वाद सुरू होता. शेडचे काम सुरू असताना रमेश संकपाळ यांची मुले अनिल संकपाळ व सुनील संकपाळ हे तेथे गेले त्यांनी शेडच्या कामात विरोध करून काम बंद पडले त्या ठिकाणी अनिल व सुनील यांनी दिलीप संकपाळ यांची मुले किरण व किशोर यांच्याशी वाद चालू केला वाद चालू असताना दिलीप संकपाळ यांनी गावातील प्रकाश बाबुराव पाटील यांना मध्यस्थी करण्यासाठी बोलावले परंतु अनिल व सुनील हे त्यांचेही ऐकत नसल्याने ते निघून गेले त्यानंतर अनिल व सुनील यांनी फोन करून त्यांचे नातेवाईक रणजीत जाधव राहणार गोळेश्वर यांना तेथे बोलावले रणजीत जाधव हा सुरज सावंत याला घेऊन गेला तेथे अनिल व सुनील यांनी त्यांना भडकावले रणजीत जाधव यांनी किरण संकपाळ व किशोर संकपाळ यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले सुरज सावंत यांनी दिलीप संकपाळ यांना मारहाण केली त्यानंतर रणजीत जाधव व इतर सर्वजण मध्यस्थ प्रकाश पाटील हे दिलीप संकपाळ यांची बाजू घेत असल्याचा संशय घेऊन त्यांना शोधण्यासाठी गेले बस स्टॉप जवळ प्रकाश पाटील स्कॉर्पिओ मध्ये बसले असताना त्यांच्यावर रणजीत जाधव यांनी चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करून त्यांना ठार केले व चारही आरोपी पळून गेले दिलीप किसन संकपाळ यांच्या तक्रारीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या सूचनेनुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी अर्चना शिंदे सचिन भिलारी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नितीन येळवे सज्जन जगताप उत्तम कोळी सचिन निकम प्रफुल्ल गाडे तसेच पोलिस हवलदार समीर कदम गणेश वेदपाठक नितीन कुचेकर जयसिंग राजगे राजेश सारुख मोहित गुरव यांची पथके तयार करून म्होपरे तसेच त्यांच्या नातेवाईकाकडे आरोपीचा शोध घेऊन गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार नितीन येळवे सज्जन जगताप उत्तम कोळी सचिन निकम प्रफुल्ल गाडे यांनी दोन आरोपी मलकापूर व दोन आरोपी शिवाजी स्टेडियम कराड इथून ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केला ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे रणजीत माणिकराव जाधव गोळेश्वर अनिल रमेश संकपाळ सुनील रमेश संकपाळ म्होपरे व सुरज निवास सावंत सूर्यवंशी मळा कराड अशी असून त्यांनी चाकूने वार करून खून केल्याचे कबूल केले आहे सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन भिलारी करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close