तरुणाने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा

तालुका प्रतिनिधी:महेश शेंडे गोंडपिपरी
गोंडपिपरी तालुक्यातील नांदगाव(फुर्डी) येथील 28 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव फुर्डी येथे आज दि.11मार्च ला शुक्रवारला घडली.मृतक तरुणाचे नाव संतोष मुर्लीधर पिंपळशेंडे रा.नांदगाव (फुर्डी) असे आहे.
दि 10 मार्च च्या रात्री त्याने आपल्या मोबाईल ला सॉरी असा स्टेट्स ठेवला होता.त्याच्या
प्रेमात भंग झाल्याने हे कठोर पाऊल उचलले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.
घटनेच्या वेळेस वडील शेतात जागलिसाठी गेले होते.तर आई शेजारीच राहत असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे गेली होती.घरी कुणीही नसल्याची संधी साधत संतोषने विष प्राशन करून स्वतःला संपविले. सदर युवक अत्यंत हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता तसेच तो गोंडपिपरी येथील एका कृषी केंद्र दुकानामध्ये काम सुध्दा करत होता.घरच्या कमावत्या मुलाने स्वतःला संपल्याने पिपळशेंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांना देण्यात आली असता पोलीस कर्मचारी गौरकर, चव्हाण ,कोवे घटनास्थळी हजर झाले. मर्ग दाखल करण्यात आला असुन मृतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे पाठवीन्यात आले आहे. पूढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गदर्शनात गोंडपीपरी पोलीस करीत आहेत.