राज्यपाला च्या विरोधात परभणीत तीव्र निदर्शने राज्यपाल हटवण्याची शिवप्रेमी ची मागणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त व वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांना घटनात्मक पदावरून तात्काळ हटवावे या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आज तीव्र निदर्शने केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ‘समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कुणी विचारले असते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे देशातील सर्व शिवप्रेमींन च्या भावना दुखावल्या आहेत शिवाजी महाराज व रामदासांचा दुरान्वये संबंध नाही हे इतिहासकारांनी संशोधनात सिद्ध केले आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून राज्यपाल अशी बेताल विधाने करत आहेत याविरोधात आज संभाजी ब्रिगेड संभाजी सेना व सर्व शिवप्रेमी च्या वतीने निषेध आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधानांना राज्यपालांना हटवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर फौजियाखान मॅडम माजी आमदार विजयराव गव्हाणे साहेब, नितीन देशमुख संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्ष, विठ्ठल तळेकर संभाजी सेना जिल्हाप्रमुख, गजानन जोगदंड संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष, रामेश्वर शिंदे संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष, बालाजी मोहिते संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख ,मंगेश भरकड मराठा सेवा मंडळ जिल्हाप्रमुख, धाराजी भुसारे मराठा समन्वय समिती गोविंद इककर,सुभाष दादा जावळे, अरुण पवार, तहसीन खान साहेब, बापूराव घाटोळ विश्वंभर गावंडे साहेब गणेश काळे गोविंद गिरि ,प्रल्हाद राठोड ,महादेव काकडे, अंगद मस्के ,पवन, प्रीतम पैठने, सुभाष पांचाळ यांच्यासह अनेक शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.