नवी दिल्ली येथे साईबाबा जन्मस्थान पाथरी साईबाबांच्या दिव्य चैतन्य पादुकांचा महा दर्शन सोहळा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
कोचरलकोटा रमा राजू चारिटेबल ट्रस्ट नवी दिल्लीचे चेअरमन सुंदरराव सीनियर एडवोकेट दिल्ली हाय कोर्ट व त्यांच्या सुविद्य पत्नी रमा सुंदरराव यांचे वतीने रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी चंडी पाठ, नवग्रह हवन,गौ पूजन आणि साई सत्यनारायण पूजा व साईबाबा दिव्यचैतन्य पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. एडवोकेट सुंदरराव व त्यांच्या सुविद्य पत्नी रमा सुंदरराव यांच्या शुभहस्ते चंडी पाठ व नवग्रह हवन पूजा करण्यात आली
साउथ कडील 11 विद्वान पंडितांनी चंडीपाठ व नवग्रह हवन पूजेचे पौरोहित्य केले. दुपारी अकरा वाजता साईबाबांच्या भव्य दिव्य पालखीची मोठ्या उत्साहात मिरवणूक झाली.
त्यानंतर 1500 साई भक्तांनी मोठ्या श्रद्धेने व भक्ती भावाने सामुदायिक साई सत्यनारायण पूजेत सहभाग घेतला.
सत्यनारायण पूजेचे पौरोहित्य साईबाबा जन्मस्थान पाथरी मंदिराचे पुजारी साई प्रसाद नारायण कुलकर्णी यांनी केले.
हायकोर्ट नवी दिल्लीचे नामवंत एडवोकेटस, आमदार खासदार तसेच दिल्ली येथील हजारो साई भक्तांनी पाथरी जन्मस्थान साई मंदिरातील दिव्य चैतन्य पवित्र पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
या भव्य दिव्य सोहळ्यासाठी साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन के कुलकर्णी, मंदिरअधिक्षीका सौ छाया कुलकर्णी, प्रभाकर पाटील उपस्थित होते.