ताज्या घडामोडी

श्री क्षेत्र उपपीठ सीमुरगव्हाण येथे श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दत्त जयंती महोत्सव होणार संपन्न

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज जगद्गुरु रामानंदचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम ता.जी. रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दी 16 व 17 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 9 वाजता श्री क्षेत्र माऊली माहेर ‘ सिमूरगव्हाण’ तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे. संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. जसे की ग्राम स्वच्छता अभियान शैक्षणिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम’ आर्थिक दृष्ट्या दुर्बळ’ घटनेचे पुनर्वसन’ महिला सक्षमीकरण’आपत्कालीन मदत उपक्रम कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित केली जातात. दि १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती वारी उत्सव संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आदिवासी’ आश्रम शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट’ शालेय दप्तर वह्या कंपास वाटप केले जाणार आहेत. संस्थानाच्या Blood In Need उपक्रमांतर्गत ज्या रुग्णांना रक्ताची गरज असते त्या रुग्णांना हॉस्पिटल येथे जाऊन आजपर्यंत २०’००० रुग्णांन रक्त देऊन प्राण वाचवले आहेत. तसेच संस्थानाचा मरणोत्तर देहदान हा उपक्रम जनसामान्यांमध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी होत आहे. सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ६८ मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेज सुपूर्द आले आहेत. महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी राज्यातील सहा राष्ट्रीय महामार्गावर ५३ रुग्णवाहिका विनामूल्य सेवा करत असून आत्तापर्यंत २५’४०० हून अधिक जखमींचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. दिनांक १४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त तसेच १६ व १७ डिसेंबर २०२४ या दिवशी जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आध्यात्मिक अमृततुल्य प्रवचन होणार आहे . सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहण उपपीठ मराठवाडा श्रीक्षेत्र सिमूरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी यांच्या वतीने केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close