ताज्या घडामोडी

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिलांनी घेतली बालविवाह प्रतिबंधक शपथ

लोक विकास केंद्र चा अनोखा व स्तुत्य उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

लोक विकास केंद्र व कोरो इंडियाच्या वतीने आदर्श नगर पाथरी येथे दि. 28 जानेवारी 2023 रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकल व सवाष्ण महिला मोठ्या प्रमाणात संयुक्तपणे सहभागी झाल्या होत्या. यावेळी भेदभाव न् करता सर्व महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून ,तिळगूळ देऊन एकमेकींचा सन्मान केला ; तसेच परंपरेला फाटा देत महिलांना वाण रूपाने महापुरुषांच्या विचारांची पुस्तके देण्यात आली. हा कार्यक्रम लोक विकास केंद्र चे कार्यवाह तथा शासनाच्या बालविवाह कृतीदलाचे व मिशन वात्सल्य समितीचे सदस्य अरविंद हमदापूरकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साजरा करण्यात आला.
सुरूवातीला जयश्री हमदापूरकर यांनी उपस्थित महिलांना कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला तर कमल प्रधान, आरती रणदिवे,ज्योती तुपसमुंद्रे यांनी संविधानिक मुल्य, शिक्षण, आरोग्य व बालविवाहचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले . कालिंदा जोगदंड, अहिल्याबाई तुपसमुंद्रे , सुमन साळवे,श्रीमती डोंगरे यांनी चळवळीची गाणी म्हणून वातावरणात उत्साह निर्माण केला ;तसेच आरती रणदिवे व रेखा मनेरे यांनी महिलांना बालविवाह प्रतिबंधक शपथ दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी राधिका कोल्हे,शितल गिरी,जयश्री हमदापूरकर, राजकन्या तुपसमुंद्रे यांनी परिश्रम घेतले तर लक्ष्मी माने,सुशिला मनेरे, ,अनुराधा हारके,इंदुमती गिरी,वेणू पांचाळ, राणी टाक,कावेरी भंडारे,रेखा आवचार, कस्तुरा महात्मे,पुजा उघडे इत्यादींनी कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close