नेरी येथे कर्करोग तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी नेरी
दि. 12फेब्रुवारी2025 सोमवार रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विन आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग सप्ताह दिनानिमित्त कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम सकाळी 9 ते 12:30 प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले

असता 30 वर्षावरील सर्व रुग्णांना प्रामुख्याने आढळणाऱ्या मुख कर्करोग तपासनी दंत शल्य चिकित्सक डॉक्टर राजेश शेंडे यांनी 62 रुग्णांची तपासणी केली असता 1 रुग्ण मुख कर्करोग संशित असल्याचे आढळून आले. तसेच स्तन कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग तपासणी डॉक्टर अश्विनी पिसे यांनी केली याकरिता इतर कर्मचारी सुषमा लोनबळे (अधिपरिचारिका), शरिक शेख ,भक्ती वेरुळकर,प्रीती बोदलकर (अ.प) यांचे सहकार्य लाभले.

सदर कार्यक्रम डॉक्टर महेश मंगर(वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी), डॉक्टर वैष्णवी कामडी(वैद्यकीय अधिकारी नेरी), डॉक्टर मनोज तेलमासरे (वैद्यकीय अधिकारी), श्रीमती पत्तीवार, अजनी ( एल एच व्ही), मडावी (एच.ए.), श्रीमती हेमके, पारशिवे ( ए .एन. एम.) यांनी सुव्यवस्थापन करून मोलाचे सहकार्य केले.