परभणी जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शिवस्वराज्य सप्ताह साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती पासून तेअभिजात मराठी भाषा गौरव दिन , 27 फेब्रुवारी या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवस्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवकालीन व्याख्यानांचे आयोजन, स्वराज्य आणि शिवरायांशी संबंधित पुस्तके, चित्रे, शिवकालीन वस्तू यांचे प्रदर्शन, विविध लोकोपयोगी शासकीय योजना, शासकीय निर्णय, याची माहिती तसेच भितीपत्रका द्वारे जनजागृती अशा विविध उपक्रमांनी शिवस्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या निमित्ताने शिवाजीनगर पाथरी येथे दिनांक 25 फेब्रुवारी रोजी शिवस्वराज सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ. भावनाताई अनिलराव नखाते, तसेच जिल्हाउपाध्यक्षा मंगलाताई सुरवसे, पाथरी शहराध्यक्षा रेणुकाताई सावळे, कोषाध्यक्षा सुनीताताई राखुंडे, उपशहराध्यक्षा लताताई साळवे,सीताताई घाटूळ, स्वातीताई भिसे, लताताई गरड आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शिवचरित्रावर व्याख्यान तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने शिवाजीनगर पाथरी येथील शाळेच्या परिसरात स्वच्छताही करण्यात आली.
शिवाजी महाराजांची शौर्याची आणि स्वाभिमानाची तसेच स्वराज्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या शिकवणीचा आपण आदर्श घेतला पाहिजे, असे गौरव उद्गार सौ.भावनाताई नखाते यांनी अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता ताई पतंगे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनीताताई राखुंडे यांनी केले, रेणुकाताई सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.