ताज्या घडामोडी

एस डी आर फाऊंडेशन कडुन सावंतवाडी तालुक्यातील पुरग्रस्तांना मदत

मुख्य संपादक : कु . समिधा भैसारे

सावंतवाडी तालुक्यातील पुरग्रस्तांना लासुरगाव लासुर स्टेशन भिसेवाडी , दहेगाव , पालखेड व शिवराई इथुन धान्य स्वरूपात मदत गोळा करुन पाठविन्यात आली .
मदतीचे धान्य सावंतवाडी तालुक्यात पोहचविन्या साठी एस डी आर फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष सिमा इंग्रोळे व अनिल इंग्रोळे यांनी मलेशियाला असुन देखील तिथल्या लोकांच्या सहकार्यातुन पुर ग्रस्तांना मदत नेण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली .
सावंतवाडी तालुक्यातील कणकवली कातकर समाज , माडखोल , शेर्ले , इन्लुली ,विलवडे , आवाडे व बांदा या गावांमध्ये एस डी आर फाऊंडेशन च्या सहकार्याने पुर ग्रस्तांना मदत पोहचवण्यात आली .
मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहचवन्यासाठी रुपेश वर्मा , राजेंद्र शाबादे , भरत वर्मा , प्रमोद नेटके व गणेश वर्मा यांनी सहकार्य केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close