ताज्या घडामोडी

देसाईगंज येथे Jvs म्यूझिक प्रोडक्शन कार्यालयाचा शुभारंभ

तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

(देसाईगज) येथील गुलमोहर कॉलोनी गांधी वार्ड देसाईगंज येथे माजी कार्यकारी अभियंता महा वितरण कंपनी चे विजयजी सैगल मेश्राम यांच्या निवास स्थानी भव्य दिव्य अशा नवीन इमारतीत कार्याल्याचे उद्घाटन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंत प्रधान लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त साधून आज jvs म्यूजिकल प्रोडक्शन कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी प्रमुख अतिथि मा. जीवन बागडे संपादक साप्ताहिक पवन पर्व ब्रम्हपुरी विशेष अतिथि नसीर जुम्मन शेख संपादक साप्ताहिक ऊंची उड़ान देसाईगंज यांचे उपस्तिथित तिन्ही मान्यवराच्या हस्ते कार्यालयाचे फित कापून उद्घाटन सम्पन्न झाले या वेळी व्हिडिओ दिग्दर्शक अभिनव कात्यायन,सुरज चुटे, अनिल नागापुरे, उपस्थित होते कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंत प्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमाना मान्यवराच्या हस्ते पुष्प माला अर्पण करुण अभिवादन करन्यात आले या वेळी पाहुण्यचे स्वागत इजी. विजय सैजल (मेश्राम) यानी पुष्प गुच्छ देऊन केले तर मान्यवरांनी गांधीजी व शास्त्री जीच्या जीवना वर प्रकाश टाकला आजच्या धकाधकीच्या जीवनात युवा पिढ़ीला व कलाकाराना वाव मिळावा या साठी jvs म्यूझिक प्रोडक्शन तयार करुण गड़चिरोली जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकाराना प्रोत्साहन देनारे ठरणार आहे सामाजिक कार्यात सक्रिय कार्य करणारे व एक दुसऱ्या च्या सुख दुखात सहभागी होणारे विजयजी सैजल (मेश्राम) सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी यांची मान्यवर पाहुण्यांचे भरभरून अभिनंदन केले कार्यक्रमाचे संचालन मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शक जगदीश गोमिला, कार्यक्रम सहकार्य साहिल मेश्राम यानी केले तर प्रस्तावित विजय सैजल व आभार प्रदर्शन चंद्रशेखर बांबोले यानी केले या कार्यक्रमास अनेक मान्यवर व आप्त मित्र परिवार उपस्थित होता.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close