ग्रामीण भागातील कोरोना समित्या निष्क्रिय

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव
ग्रामीण भागातील पानटपरी धारक व इतर व्यावसाईक, राज्य शासनांनी जाहीर केलेल्या ब्रेक द चैन या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र शासनांनी १४ एप्रिल च्या संध्याकाळच्या ८ वाजतापासून ब्रेक द चैन चि नवीन नियमावली लागू झालेली आहे. संपूर्ण राज्यात १४४ कलम संचारबंदी व जमावबंदी लागू झालेली आहे. या नवीन नियमावलीचे ग्रामीण भागात संचारबंदीचे व जमावबंदीचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.आजही ग्रामीण भागात मोठ्या लोकसंखेच्या उपस्थित लग्न सोहळे साजरे केले जाताना दिसत आहेत. ग्रामीण भागातील पानटपरी धारक व इतर व्यावसाईक ना सनिटाझर, ना मास्क, ना सामाजिक अंतर, आणि तंबाखू युक्त वस्तू मोठ्या प्रमाणात विकताना दिसत आहेत. हे पानटपरी धारका कोरोनाला वाढविण्यासाठी बढावा देत असताना दिसत आहेत. यावत आडा घालण्यासाठी गावातील कोरोना समितीने पुढे पाउल टाकणे गरजेचे आहे. चिमूर तालुक्यातील नेरी,भिसी,जांभूळघाट, शंकरपूर, खडसंगी,मासळ, मोटेगाव , चिमूर व ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता चिमूर तालुक्यात १५ एप्रिल ते १ मे पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला.
चिमूर तालूक्याती व्यापारी, सामाजिक संघटना,पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार अत्याव्यश्यक सेवेत मोडणारे भाजीपाला,किराणादुकान, कृषी आदीची दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ वाजता पर्यंत बंद करावे लागणार आहे. २ वाजता पासून संपूर्ण तालुक्यात त्यानंतर संचारबंदी व जमावबंदी राहणार आहे. असे असताना आजही ग्रामीण भागात संचारबंदीचे व जमावबंदीचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. तेव्हा ग्रामीण भागातील ग्राम पंचायत व ग्रामीण भागातील कोरोना समिती यांनी उल्लंघन एक पाउल टाकणे गरजेचे आहे.