श्री.संत संताजी जगनाडे महाराज पादुका व जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रंथ दर्शन सोहळा गोरेगाव येथे उत्साहात साजरा

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
गोरेगाव- संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पादुका व जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रंथ दर्शन सोहळा माननीय हरिराम येळणे जिल्हा अध्यक्ष सेवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. रथाचे आगमन मा दुर्गा मंदिर गोरेगाव येथे सायंकाळी ७ वाजता झाले.यावेळी प्रमुख अतिथी माननीय आर.आर.अगडे अध्यक्ष तेली समाज गोरेगाव,पी.पी.साखरवाडे सचिव गोरेगाव, रामभाऊ अगडे उपाध्यक्ष,छन्नीलाल अगडे कोषाध्यक्ष,मुन्नालाल बावणकर अध्यक्ष सेवा आघाडी गोरेगाव, खुशाल वैद्य युवा आघाडी अध्यक्ष गोरेगाव, युवराज येळणे सचिव घोटी , एकनाथ साठवणे उपाध्यक्ष, राधेश्याम लोहबरे उपाध्यक्ष, नंदकिशोर बावणकर सचिव,देवानंद येळणे उपाध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी सौ.सरिता येळणे,सौ.उर्मीला साठवणे,सौ.वसुदा न्यायकरे,सौ.इंदूबाई गिरेपुंजे,सौ.सुरेखा येळणे,सौ.रेखा लोहबरे,सौ.चंदा लांजेवार,सौ.पुष्पा येळणे हे होते. मा दुर्गा मंदिर गोरेगाव येथून पालखी रथ नगरातुन ढोल ताशा पथकाच्या गजरात फटक्यांच्या आतीशबाजीत मिरवत ठाणाचौकात समारोप करण्यात आली.यावेळी बहुसंख्येने समाज उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तेली समाज घोटी,तेली समाज गोरेगाव,तेली समाज कुर्हाडी व तेली समाज झांजीया यांनी परिश्रम घेतले.समस्त तेली समाज बांधवांचे आभार महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा गोरेगाव कडुन मानन्यात आले.चहापाणी करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.