ताज्या घडामोडी

वरोरा उपजिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

दिनांक 01/08/2022रोजी उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे स्तनपान सप्ताहाची सुरुवात करण्यात आली . डॉ. अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक ,उप जिल्हा रुग्णालय वरोरा,.जी.जी.माकोडे माजी मुख्याधयापक,सौ. वंदना विनोद बरडे, सहा.अधीसेविका ,उप जिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या हस्ते स्तनपान पोस्टर प्रदर्शनी चे उ्घाटन करण्यात आले. तसेच सौ. वंदना बरडे यांनी आपल्या प्रास्ताविकामधून लाभार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .हा कार्यक्रम असाच संपूर्ण सप्ताह चालू राहील आणि या सप्ताह मध्ये रोज विविध स्पर्धा घेण्यात येईल. यामध्ये पाककृती स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा घेण्यात येतील.या सर्व स्पर्धेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.पोस्टर प्रदर्शनी करिता श्रीमती.सरस्वती कपटे परिसेविका ,कु.मीना श्रावणजी मोगरे अधीपरीचारिका, श्रीमती ढोक आहार तज्ञ,श्रीमती.बुरेवर ,श्री. चंद्रशेखर समुंद्रे, श्रीमती कुंदा मडावी ,श्री.कैलाश समुंद्रे ,स्मितेश लोखंडे यांनी मेहनत घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close