पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पाथरी च्या वतिने गरिब, निराधार,विधवा महिलांना साडी-चोळी देऊन “जागतिक महिला दिन” केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
दि.८/३/२०२२ : परभणी जिल्हातील पाथरी येथील नगर परिषद मध्ये संथापक अध्यक्ष-मा.डॉ.संघपाल उमरे सर यांच्या आदेशाप्रमाणे व महाराष्ट्र राज्य सचिव-मा.विनोद पञे,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार-मा.सुभाषजी सोंळके,महाराष्ट्र राज्य सहसचिव-विशाल देशमुख, महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख-मा.माधुरीताई गुजराती यांच्या मार्गदर्शनखाली जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा व आवक/जावक विभागातील,स्वच्छता विभागातील,सफाई कामगार महिला,विधवा महिला, परित्यक्ता,धुणं-भांडी करणाऱ्या निराधार,गरिब महिलांचा साडी-चोळी व पुष्प हार देऊन

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष-मा.रेखाताई मनेरे यांच्या नेतृत्वाखाली सौ.सुमन गवारे,सौ.सुनिता मुजमूले,प्रयाग बाई हिवाळे, श्रीमती सिताबाई मगर, श्रीमती सुंदरबाई कांबळे,व सर्व “सावित्रीच्या लेकींना” पोलीस मिञ परिवार समन्वय समिती समितीच्या सर्व महिला पदधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत साडी-चोळी,पुष्प हार देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून OS कार्यालयीन अधिक्षक मा.श्री. बि.यू.भालेपाटील साहेब, कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.श्री.बळवंत दिवाण साहेब तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून मा.पडधान सर,मा.सलीम खान पठाण, सामान्य प्रशासन निवडणूक विभाग मा.श्री.राजु विशवामीत्रे साहेब,शेख मुस्तफा काद्री फसीयोद्यीन, आगनिशामक विभाग मा. खुर्रम खान,किरण नाईक, अशोक भाग्यवंत,इंजिनिर अनिल गालफाडे यांच्या प्रमुख उपस्थिती व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या मराठवाडा विभाग,परभणी विभाग, पाथरी तालुक्यातील पदधिकारी सौ.शिला गायकवाड,सौ.सुमन साळवे,सौ.मुक्ताबाई डोगंरे, सौ.रेखा मनेरे,सौ.लता साळवे,सौ.प्रजावती नाथभजन,सौ.सुनिता मुजमूले,मधुकर सुर्यवंशी, गणपत कांबळे व अहेमद अन्सारी मराठवाडा अध्यक्ष या सर्वांच्या प्रमुख उपस्थित गरिब,निराधार विधवा महिलांना महिलांना आपुलकीचा,जिव्हाळ्याचा आधार देऊन “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा महिला विभाग प्रमुख श्रीमती रेखा मनेरे यांनी केले,तर सुत्रसंचालन सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे तालुका अध्यक्ष यांनी केले तर आभार सौ.शिला गायकवाड यांनी व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठवाडा विभाग,परभणी विभाग,व पाथरी तालुक्यातील सर्व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांनी सहकार्य व मदत केली.अश्या प्रकारे राबवलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरावरुन खुप-खुप कैतुक केले जात आहे.