चिमूर नेरी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
चिमुर नेरी मार्गावर काल रात्री च्या 10-30 वाजता च्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत नेरी येथील प्रदीप पुंडलिक झाडे यांचा अपघातात निधन झाले सदर अज्ञात वाहनाचा तपास सुरू आहे
नेरी येथील प्रदीप झाडे वय 46 वर्षे हे साईबाबा विद्यालय आमडी येथे लिपिक म्हणून कार्यरत होते ते एक प्रतिष्ठित नागरिक होते तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटना चिमूर तालुका अध्यक्ष होते सध्या ते ग्रामपंचायत निवडणुकी चे काम पाहत होते कामे करीत असताना उशीर झाल्यामुळे उशिरा ते चिमूर वरून नेरी ला घरी जाण्यासाठी 10,30 वाजता च्या दरम्यान निघाले असता मार्गावर कुठल्या तरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि पसार झाले रात्रीची वेळ असल्याने अज्ञात वाहनाचा थांगपत्ता लागला नाही या अपघातात त्यांची दुचाकी रस्त्यावर पडली होती आणि ते बाजूला पडले होते अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अज्ञात वाहनविरोधात मर्ग दाखल करण्यात आले असून पुडील तपास api मोहोड करीत आहेत
प्रदिव झाडे यांचे आज 12 वाजता नेरी येथील उमा नदीवर अंतीमसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी आई 2 मुले 2 भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या अंतीमसंस्कार ला शिक्षकेतर कर्मचारी संघटना चे सर्व पदाधिकारी नातलग मित्र मंडळ आप्त मंडळी उपस्थित होते