एक महिन्यापासून बोरगव्हान अंधारात

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बोरगव्हाण ता.पाथरी दलीत वस्तीतील नविन डि.पी. व सिंगल फेज डि.पी. दुरुस्त करुन देणे बाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष कृष्णा कांबळे यांची मागणी.
मोजे बोरगव्हाण ता.पाथरी दलीत वस्तो व सिंगल फेज डि.पी.एक महिन्यापासून नादुरुस्त आहे.सदरील दलीत वस्तीमध्ये नविन डि.पी.सहा महिन्यांपूर्वी बसवला आहे,एकदा त्यामध्ये बिघाड झाली आहे .गुत्तेदार दिलीप मोरे यांच्या म्हणण्यावरुन गंगाखेड येथे जाऊन व पाथरी महावितरण कार्यालयाचे इंजिनीयर सेंबाळे साहेब यांना म्हणून नविन डि.पी.चालू करा यासाठी गावातील शिष्ट मंडळ यांनी मागणी केली परंतु सेंबाळे साहेब म्हणतात की अगोदर बीले भरा. त्याशिवाय गावातील लाईट सुरू करणार नाही सध्या कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे अर्थिक नुकसान झालेले आहे.आज शेतकरी पुर परिस्थितीने हवालदिल झालेला आहे . गावातील मजुर कामासाठी मुंबई पुणेच्या दिशेने जात आहेत.पोटाचा प्रश्न मिटला नाही की , पाथरी महावितरण कार्यालय बील भरण्यासाठी सांगत आहेत .विदयुत पुरवठा मागील एक महिण्यापासुन बंद केले आहे व बोरगव्हाण गावातील दळणवळण साधन बंद पडले आहेत.मौजे बोरगव्हाण येथे रोगराईचे प्रसारण झाले आहे . डेग्युचे सहा , चिकण गुणीयाचे तीन , मलेरियाचे नऊ , गरोदर 4 आहेत,तसेच दम्याचे पेशंट एकुण 16 जण यांना वाफ घेणे खुप महत्वाचे आहे . पावसाळयाचे दिवस असल्यामुळे सतत यांच्यावरील उपचार घेणे साठी लाईट आवश्यक आहे.व बोरगव्हाण नागरीक तीन हप्त्यात बील भरण्यासाठी तयार आहेत . परंतु वीज पुरवठा बंद केल्याने संतापले आहेत . गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे लवकरात लवकर डि.पी.दुरुस्त करुन लाईट सुरळीत करण्यात यावी व काही गावकऱ्यांनी थ्री फेज वरुन लाईट घेतली असता हेल्पर पितळे यांनी बंद केलेले आहे व बोरगव्हाण , शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे.विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.व गावामध्ये रात्रीच्या वेळेस साप निघून जीवित हानी होत आहे, पिठाची गिरणी बंद असल्याने अबाल वृद्ध यांचे हाल होत आहेत त्यामुळे माय बाप प्रशासनाने लक्ष घालून लाईट प्रश्न मार्गी लावावा हीच गावकरी यांची अपेक्षा आहे.