मानसिक आजारी महिलेच्या मदतीला धावले नगरसेवक पडोळे

तालुका प्रतिनिधी:सनम रा. टेंभुर्णे
ब्रम्हपुरी येथील भवानी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या कुंदा बावनकुळे या मानसिक आजारी महिलेच्या मदत करून या वॉर्डातील नगरसेवक राकेश पडोळे यांनी मानवतेचे दर्शन घडविले.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी कुंदा बावानखेडे यांचे पती गणेश बावानखेडे मरण पावले यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाले. घरातील महत्वाचा आधार हरपल्याने कुंदा बावनखेडे यांची आर्थिक परिस्थिती कठीण झाली यात तीन मुलींसह अत्यंत कठीण परिस्तितीत जगत होत्या.
यामुळे त्यांची मानसिक अवस्था हळूहळू अधिकच बिघडत गेली. त्या अनेकदा वॉर्डात भटकत फिरत असायचे तर कधी माती, विटा खाताना दिसायचे तर कधी रात्रौला गोंधळ घालत फिरत असायचे अशी गंभीर परिस्तिथीती निर्माण झाली होती.
या परिस्तितीची माहिती स्थानीक नागरिक सिंधू भास्कर सहारे यांनी नगरसेवक पडोळे यांना दिली. माहिती मिळताच लगेच पडोळे यांनी महिलेची पाहणी केली आणि त्यांच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली. नंतर लगेच त्यांनी स्वतः ऍम्ब्युलन्स बोलावले व उपचारासाठी महिलेला हलवले. यामध्ये सिंधू सहारे व किरण बावानखेडे यांनीही मदतीला हात लावले.त्यानंतर त्या महिलेला नागभीड येथील छत्रपती शिवाजी महाराज फॉउंडेशन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. नगरसेवक पडोळे यांनी केवळ दाखल करण्यापूरतेच नाही तर आर्थिक मदत पण केली. आणि समोर नियमित फोनद्वारे प्रकृतीची माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनेत प्रशासनापासून पुढे येत लोकप्रतिनिधिने दाखवलेली तत्परता याची सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे माहीलच्या प्रकृती बरी होण्यास गती मिळाली आणि तिच्या परिवारास दिलासा मिळाला आहे.









