श्री साई कॉन्व्हेन्ट,जिवीका इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज भिसीची घवघवीत यशाची परंपरा कायम…!

प्रज्ञाशोध परीक्षा 2026 मध्ये मिताली रामटेकेने पटकविला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यातील मौजा भिसी येथील श्री साई कॉन्व्हेंट तथा जीविका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन व अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यावर्षीही शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून भिसी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
शाळेतील इयत्ता 5 वी मधील कू. अधीरा सुरेंद्र घरत, स्वरा श्याम येरूनकर, उर्वशी समीर घंदरे पूर्वी एकनाथ ठोंबरे या विद्यार्थीनी तसेच इयत्ता 8 वी तील कुं. पलक गुरुदास क्षीरसागर या विद्यार्थीनीने महाराष्ट्र राज्य उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवित आई-वडील, शिक्षक, शाळा तसेच आपल्या गावाचे नाव रोषण केले आहे. या सोबतच इयत्ता 3 री तील कु. मिताली ताराचंद रामटेके हिने प्रज्ञाशोध परीक्षा 2026 मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक अध्यापन पद्धती, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन, इंग्रजी माध्यमातील दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारे वातावरण यामुळेच हे यश शक्य झाले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या या घवघवीत यशामुळे परिसरातील पालकांकडून समाधान व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे.









