मा. शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना निमंत्रण

मा. शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना निमंत्रण
महाराष्ट्रात सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या PM-SHRI जि. प. कें. प्रा. शाळा. मानवत शाळेला भेटीचे, मा. शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांना निमंत्रण – सभापती कृष्णा भैय्या शिंदे यांची माहिती.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत तालुक्यातील PM-SHRI जि. प. कें. प्रा. शा. मानवत, गुणवत्तापूर्ण शिक्षण व महाराष्ट्रात सर्वात जास्त पटसंख्या असणारी शाळा असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शाळेने, छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून राज्यस्तरावरती विभागाचे नेतृत्व केलेले आहे, करीता या शाळेला, भेट देण्याचे निमंत्रण आज रोजी, भुसे साहेब यांचे निवासस्थान “जंजिरा ” येथे सभापती कृष्णाभैय्या शिंदे, यांनी दिले, यावेळी मा. शिक्षणमंत्री महोदय यांनी जून महिन्यात भेटीसाठी नक्कीच येणार असे आश्वासन मा. मंत्री महोदय यांनी दिले ,विविध उपक्रम राबवत असणारी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राज्याला दिशादर्शक आहे,जेव्हा मला आपल्या शाळेबद्दल माहिती मिळाली तेव्हाच मी शाळेला भेट देण्याचे ठरवले आहे, आणि आपल्या शाळेबद्दल माहिती मी विधानसभेतही दिली आहे,आपण खूप चांगले कार्य करत आहात,आज रोजी पटसंखेच्या अभावी अनेक शाळा बंद होत आहेत, परंतु आपल्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या 1300 पेक्षा जास्त आहे, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे,असे गौरवोद्गार मा. शिक्षणमंत्री महोदय यांनी व्यक्त केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ सर यांनी शाळेने प्रकाशित केलेले “ज्ञानामृत ” पुस्तक व शाळेची गौरवगाथा असणारे कार्यपुस्तिका मा. मंत्री महोदय यांना दिले, यावेळी मा. सभापती संतोष आंबेगावकर, पप्पू भैय्या सोरेकर, मा. उपसरपंच मनोज भिसे,SMC सदस्य नामदेव खिळदकर सर,सोमनाथ मोहकरे सर, यांची उपस्थिती होती.









