ताज्या घडामोडी

नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अनागोंदी कारभार, सभेचे नोटीस काढून सभेलाच दांडी

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?

जनआरोग्याच्या सभेचे पत्र काढून, माहिती असूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मारली दांडी, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दि 30 मार्चला जनआरोग्य समितीची सभा आयोजित केली होती समितीचे सदस्य सभेला गेले असता सभेच्या सभागृहला ताला दिसल्याने तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने जनआरोग्य समितीच्या सदस्यांना आल्या पावली परत यावे लागले यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व तालुका अधिकाऱ्याचा बेजवाबदार दिसून आला आणि नेहमीच या न त्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा अनागोदी कारभार चव्हाट्यावर आला तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
नेरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोठे केंद्र असून या केंद्राला चार उपकेंद्र जोडलेले आहेत या केंद्रात प्रमुख वैद्यकीय अधिकारी आणि तालुका अधिकारी यांच्या उपस्थितीत जनआरोग्य सभा दर महिन्याला घेतली जाते दि 30 मार्चला ही सभा घेण्याचे पत्र काढण्यात येऊन प्रत्येक सदस्यांना दि 24 मार्चला पत्र देऊन माहिती देण्यात आली त्यामुळे दि 30 मार्चला सर्व सदस्य उपस्थित झाले मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते तेव्हा त्याच्या बदल माहिती विचारली असता सभेबद्दल कोणीही बोलले नाही या केंद्रात डॉ कामडी आणि डॉ तेलमासरे हे दोन प्रमुख वैद्यकीय अधिकारी आहेत दोघेही यावेळेस उपस्थित नव्हते त्यामुळे या अधिकाऱ्यांचा बेजवाबदारपणा दिसून आला याना ग्रामीण जनतेशी काहीही देणे घेणे नाही ,रुग्णांशी कुठलीही काळजी नसून रामभरोसे कारभार करण्याची नेहमीचीच सवय उघड झाली जनआरोग्य सभा ही ग्रामीण आरोग्याची नाळ जुळलेली आणि महत्वाची सभा असते या सभेत रुग्णांच्या सोयी सुविधा ग्रामीण भागातील रुग्णाच्या आरोग्यावर चर्चा तसेच अहवाल तयार केले जाते आणि त्याची माहिती जिल्हा स्तरावर शासनाला दिली जाते मात्र सभेला दोन्ही अधिकाऱ्यांच्या दांडी ने रुग्णांचे प्रश्न ऐरणीवर आले आहे तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अश्या बेजवाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
@@@@@@@@@@@@@

जनआरोग्य समितीच्या मासिक सभा च्या पत्रानुसार सभेला गेलो असता प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते ,गैरहजर होते यामुळे नाहक त्रास झाला मात्र या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बेजबाबदार वागणुकीची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी

आशिष ननावरे सदस्य जनआरोग्य समिती तथा प्रशासक (माजी सरपंच ग्रा प काजळसर)

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close