ताज्या घडामोडी
श्री साई कॉन्व्हेन्ट व जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल भिसी चे सुयश

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
मेरी मिटटी मेरा देश या शासनाच्या अभियाना अंतर्गत
राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथे दिनांक 18-10-2023 ला तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल भिसि ची कु. जान्हवी मंगेश तिखट या विद्यार्थिनी ने तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला त्यानिमित्त आंबेनेरी केंद्राच्या वतीने ताराचंद रामटेके (केंद्रप्रमुख )यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा सत्कार व सन्मान करण्यात आला तसेच सैनिकी स्कूल चंद्रपूर चा विद्यार्थी ग्रीष्म ताराचंद रामटेके यांनी शाळेत येऊन भेट दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा शाळेचे वतीते स्वागत करण्यात आले.
ग्रीष्म रामटेके यांनी विद्यार्थांना सैनिकी स्कूल बाबत माहिती दिली तसेच रामटेके केंद्रप्रमुख यांनी सर्व विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व शुभेछ्या दिल्या.