ताज्या घडामोडी

नान्होरी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न

मुख्य संपादक : कु.समिधा भैसारे

विश्वशांती पवारणा धम्मभुमी सेवा समिती दिघोरी (नान्हेरी ) च्या विद्यमाने बौद्ध धम्म परिषद , तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीची स्थापना तथा भिक्खु निवास लोकार्पन सोहळा संपन्न झाला .


सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहन ९-३० भिक्खु संघाची बुद्ध वंदना पुज्य भंदत झानजोती महास्थवीर , भिक्खू डॉ. धम्मसेवक महाथेरो, भिक्खु संघरत्न थेरो , भिक्खू नंद थेरो ‘ भिक्खु सोन व पुज्यनिय भिक्खू संघ यांच्या हस्ते संपन्न झाली त्या नंतर समता सैनिक दलाची मान वंदना तालुका संचालक आयु . डेविड शेंडे व आयु. चंद्रभान राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाली कार्यक्रमाचे उदघाटक आयु. सुलभा भिमराव चंदनखेडे भिक्खू निवास दानकर्ते नागपूर ह्या होत्या

दुपारी सत्कार समारंभ व भिक्खू संघाची धमदेसना घेण्यात आली सांय. सांस्कृतिक कार्यक्रम व एकपात्री नाट्यप्रयोग मी जगेन माणुस म्हणून माणसासाठी या नाटकाचे सादरकर्ते धर्मेंद्र रामटेके हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.प्रा. नेरेश रामटेके व आयु. विद्या देवेन सुखदेवे यांनी केले तर आभार आयु. मनिशा घरडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक विश्वशांती पवारणा धम्मभुमी सेवा समिती दिघोरी (नान्हेरी ) च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close