सुंदर माझे उद्यान स्पर्धा! ६०पेक्षा अधिक संघ स्पर्धेत सहभागी

रंज्जू मोडक यांच्या टीमचाही या स्पर्धेत सहभाग
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर महानगरपालिकाच्या वतीने सुंदर माझे उद्यान ही स्पर्धा शहरात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत शहरातील साठ पेक्षा अधिक संघाने आपला सहभाग नोंदविला असल्याचे समजते. स्पर्धेच्या निमित्ताने सदैव जनसेवेसाठी तत्पर असलेल्या चंद्रपूरातील ” योग नृत्य” या नावाजलेल्या संस्थेने पुढे येऊन शहरातील एकूण 11 जागेंची स्वच्छता करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. स्थानिक सिध्दीविनायक मंदिर चवरे लेआऊट ,गुरूद्वाराच्या मागे एक मंदिर आहे. परंतु सद्यस्थितीत त्या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवली असून तेथे साप व विंचूचे प्रमाण देखील वाढले असल्याचे प्रत्यक्षात दिसून पडते नित्य लोक त्या मंदिरात दर्शनाला येतात. उपरोक्त परिसरात अद्याप साफसफाई झाली नाही. दरम्यान तो परिसर सर्वांगिण सुंदर व सुरेख बनावा अशी महानगर पालिका आणि चंद्रपूर शहरातील योग नृत्य परीवारची अपेक्षा आहे. त्याच अनुषंगाने योग नृत्य परिवारचे जनक गोपाल मुंदडा यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूरातील सामाजिक कार्यात सदैव मोलाचे योगदान देणाऱ्या व महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंजु मोडक यांच्या नेतृत्वात त्यांची संपूर्ण टीम सिध्दीविनायक मंदिर परिसरात गेल्या एक आठवड्यापासून नियमित स्वच्छता अभियान राबवित आहे.त्यांच्या या कार्यात स्थानिक जनतेचा देखिल सहभाग असल्याचे टीम प्रमुख रंज्जू मोडक यांनी आज या प्रतिनिधीला सांगितले.
गोपाल मुंदडा हे नित्य संपूर्ण टीमला मोलाचे मार्गदर्शन करीत असल्याचे रंज्जू मोडक बोलताना या वेळी म्हणाल्या.श्रमदान करून मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी ही टीम सध्या कार्यरत आहेत.शहरातील रंजु मोडक यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण टीम एक महिना श्रमदान करून सिध्दीविनायक मंदिर स्वच्छ व सुंदर बनविणार आहे.गत वर्षी देखिल रंज्जू मोडक यांच्या सह त्यांच्या टीमने मनपाच्या या उपक्रमात पुढाकार घेत उल्लेखनीय कामगिरीचा पुरस्कार मिळविला होता. हे सर्वश्रुतच आहे.सध्या त्यांच्या या कार्यात त्यांना रेनुका काळे , भालचंद्र काळे , भावना टोटे , वैशाली टोटे , अनिता काळे , शरदचंद्र नागोसे, पंचफुला चिडे , लीलाबाई काळे , नारायण मोरे ,राधिका कुळकर्णी, कविता घुमे ,सुगंधा गौरकार, अविनाश दोनाडकर,शिशिर काटे आदींचे सहकार्य लाभत आहे .तर गोपाल मुंदडा हे या टीमला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करीत आहे.