मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ एस एम देशमुख यांचा पाथरीत सत्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पत्रकारांची मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ तथा पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष एस एम देशमुख हे माहुर येथे पत्रकार संघाच्या कार्यक्रमा साठी जात असतांना पाथरी पत्रकार संघाला धावती भेट दिली या वेळी मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मिडियाच्या वतीेने स्वागताध्यक्ष मुंजाभाऊ नाना टाकळकर यांनी एस एम देशमुख आणि त्यांच्या सहका-यांचा शाल, पुष्पहार,गुच्छ देऊन सत्कार केला.

शासकीय विश्राम गृह पाथरी येथे शुक्रवार १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या या सत्कार कार्यक्रम प्रसंगी एस एम देशमुख यांच्या सोबत मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, बीड जिल्हाध्यक्ष सतिष साळूंके, सुभाष नागलगावकर, दिलीप झाडे, हरीष यादव, सुधीर नागापुरे, रत्नाकर कुलथे आदी उपस्थित होते. या वेळी या कार्यक्रमा साठी मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मिडियाचे परभणी ग्रामिण जिल्हाध्यक्ष किरण घुंबरे पाटील,पत्रकार संघाचे पाथरी तालुकाध्यक्ष धनंजय आडसकर,सल्लागार अॅड श्रिपाद कोंत,भास्करराव पंडीत,अयुब खान,अहेमद अन्सारी,विठ्ठल प्रधान, गणेश जत्ती,के डी कदम, उद्धवराव इंगळे,दत्तराव उपाडे यांची या वेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन अॅड श्रिपाद कोंत यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष धनंजय आडसकर यांनी मानले.