दिव्यांगाणा ५%टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयांवर चढून विरुगिरीने आंदोलन करु

प्रहार सेवक विनोद यांचा गट विकास अधिकारी यांना निवेदनातून इशारा

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत सचिव यांनी जर अपंगांना ५%निधि तात्काळ वितरित नाही केला तर ग्रामपंचायत सचिव यांचा खुर्ची टेबल जाळण्यात येईल याची नोंद घ्यावी
दिव्यांगाना ५ %टक्के निधि त्वरित वितरित करा अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर चळून विरुगिरिने आंदोलन करुन असा इशारा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनातून देण्यात आला . चिमूर तालुक्यातील ग्रामपंचायत यांनी ५ % टक्के निधि अखर्चित ठेवला आहे तरी पंचायत समिती स्तरावरुन आदेश देऊन ग्रामपंचायत सचिव यांनी ५ टक्के निधि त्वरित वितरित करण्यात यावे जर पंचायत समिती स्तरावरुन आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायत सचिव यांनी जर ५% टक्के निधी वितरित नाही केला तर ग्रामपंचायत सचिव यांच्या खुर्ची टेबल जाळण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला असता गट विकास अधिकारी यांनी पंचायत समिती येथे बैठकीत आढावा घेऊन ग्रामपंचायत अपंगांना ५%टक्के निधी वितरित करण्यात यावे असे पत्र काढण्यात आले प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दिलेल्या निवेदनाची गट विकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली . त्यावेळी निवेदन सादर करतांना उपस्थित प्रहार सेवक लोकेश खामनकर, मुरलीधर रामटेके,आदीत्य इंगोले, मिलिंद खोब्रागडे, नारायण निखाडे, सचिन घानोडे, रमेश वाकडे आदी उपस्थित होते.