ताज्या घडामोडी
पाथरी येथे महाआवास अभियान अंतर्गत उत्कृष्ट घरकुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांना पुरस्कार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पंचायत समिती पाथरी येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त व महाआवास अभियान अंतर्गत उत्कृष्ट घरकुल बांधणाऱ्या लाभार्थी व उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत तसेच इंजिनीयर व कर्मचारी अधिकारी यांना पुरस्कार देण्यात आले. पाथरी पंचायत समिती अंतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब टेंगसे माजी सभापती जिल्हा परिषद परभणी पाथरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब खरात, माजी प.स. सभापती राजेशजी ढगे ,जन्म भूमी फाउंडेशन चे अध्यक्ष माजी सभापती सदाशिव थोरात सर, मा.पंचायत समिती सदस्य अजय थोरे, डॉ.महेश कोल्हे,बंटी पाटील घुंबरे सरपंच, लक्ष्मण केंद्रे सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.