बॅलेट युनिट वर उमेदवारांचे निवडणूक निशाणी असलेल्या मतपत्रिका डकऊन सिलिंग चे काम पूर्ण

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
98 पाथरी विधानसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी उभे असलेल्या 14 उमेदवारांचे निवडणूक निशाणी असलेल्या बॅलेट पेपर बॅलेट युनिटवर डकऊन सिलिंग करण्याची प्रक्रिया शासकीय औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था पाथरी येथे सकाळी उमेदवारांच्या व प्रतिनिधींच्या उपस्थित सुरू झाली निवडणूक विभागाने 415 मतदान केंद्राचे कंट्रोल युनिट बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट या तिन्ही यंत्रणावर उमेदवारांचे निवडणूक निशाणीचे स्कॅनिंग , अपलोडिंग व सेलिंग करण्याची प्रक्रियाचे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण केले.
याच ठिकाणी प्रतिनिधींच्या सहमतीने 5 टक्के प्रमाणे 21 केंद्राला दिले जाणारे त्या त्या मतदान केंद्राला अलाउट झालेल्या ईव्हीएम मशीन वर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक ई व्ही एम वर 1000 मतदान करण्याची प्रात्यक्षिक प्रक्रिया (मोकपोल) करण्यात आली व कंट्रोल युनिटवर नोंदविलेल्या एकूण मते व VVPAT मध्ये ज्या उमेदवारांना मतदान केले त्याचे चिठ्ठ्या यांची गणना करून दोघांमध्ये तफावत तर नाही ना याची पडताळणी करण्यात आली सर्व व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात आली राखीव ईव्हीएम सहित 498 कंट्रोल युनिट बॅलेटिन युनिट व व्हीव्हीपॅट तयार करण्याची प्रक्रिया 35 टेबलावर 15 राऊंड मध्ये पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती श्री शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी दिली
सर्व प्रक्रियांवर नजर ठेवण्यासाठी श्री पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत, श्री शंकर हांदेशवार तहसीलदार पाथरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काम पाहिले. त्यांना सहायक म्हणून वसंत महाजन नायब तहसीलदार निवडणूक पाथरी, श्री धारासुरकर नायब तहसीलदार मानवत निवडणूक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.