ताज्या घडामोडी

सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनाने कार्यशाळेत चैतन्याचे वातावरण

उपसंपादकःविशाल इन्दोरकर

ना शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या साताऱ्याच्या पत्रकारितेची परंपरा देशभर पोचवण्यासाठी संघटनेला शुभेच्छा…!

DMEJ संघटनेची पहिली सातारा जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेला जिल्ह्यातील सुमारे दीडशे पत्रकारांचा उदंड प्रतिसाद

संस्थापक अध्यक्ष राजे माने यांना मानपत्र, पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढ्याचा हार घालून सत्कार

सातारा, दि. १ मार्च : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर हे आपल्या सातारा जिल्ह्यातील संघटनेतील पदाधिकारी, सदस्यांना बरोबर घेऊन नेहमी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांसाठी प्रयत्नशील असतात. जी सत्य बाजू आहे, ती बाहेर यावी आणि अशाच पद्धतीने साताऱ्याची पत्रकारितेची परंपरा आहे, ती राखत आपल्या संघटनेने काम करावे, असे आवाहन श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करून संघटनेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या सातारा शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या मानसन्मान व पहिल्या जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळा सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आयोजित केली होती. यावेळी जिल्ह्यातील सुमारे दीडशेहून अधिक पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
यावेळी जिल्ह्यातील मान्यवर व पत्रकार मानसन्मान व कार्यशाळेचा प्रारंभ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे फोटोचे पूजन, दीपप्रज्वलन व महाराष्ट्र गीताने झाली.

यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा माहिती अधिकारी सातारा, तथा उपसंचालक पुणे श्रीमती वर्षा पाटोळे छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माध्यमतज्ञ राजा माने सर कार्यक्रमाच्या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सातारा जिल्हा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजे माने यांना मानपत्र, पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी राजा माने सर यांचे अध्यक्षिय भाषण झाले. श्रीमती वर्षा पाटोळे यांनी डिजिटल मीडिया पत्रकार व शासन धोरण याविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे त्यांची भाषणे झाली.

यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आज डिजिटल मीडिया फार वेगवान वाढत आहे. पूर्वेसारख्या ज्या बातम्या वर्तमानपत्रांमधून दुसऱ्या दिवशी यायच्या त्या आता सेकंदामध्ये जगभर प्रसारित होत आहेत. यामध्ये पत्रकारिता जी आहे ती जबाबदाऱ्यांनी पार पाडावी लागते. एखादी चुकीची बातमी जर सोशल मीडियावरून कुठे जरी गेली तरी त्याचा लगेच वेगळा परिणाम समाजामध्ये तयार होत असतो. ह्या परिस्थितीमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना काम करत आहे. त्याबद्दल मनापासून संघटनेला शुभेच्छा.! संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर हे आपल्या सातारा जिल्ह्यातील संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांना बरोबर घेऊन ते नेहमी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांसाठी प्रगतीसाठी प्रयत्नशील असतात. जी सत्य बाजू आहे ती बाहेर यावी आणि अशाच पद्धतीने साताऱ्याची पत्रकारितेची परंपरा आहे, ती राखत आपल्या संघटनेने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कार्यशाळेला मनापासून शुभेच्छा देतो.!

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे दोनशे पत्रकारांनी सहभाग घेतला होता. यावेळी यावेळी मान्यवरांचा शाल, शील्ड, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य, महिला पत्रकार व वेस्ट युट्युबर संपादक पत्रकारांना नियुक्तीपत्र व शाल, शील्ड, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक तेजस राऊत, राज्य सचिव महेश कुगावकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, संघटनेचे अजिंक्य स्वामी, पराग जवळकर, सातारा शहराध्यक्ष अजित सोनवणे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ साखरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संपादक मालक पत्रकार संघ राज्याध्यक्ष संजय कदम, राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी, उपाध्यक्ष महेश नलावडे, जिल्हा सचिव संजय कारंडे, व जिल्हा, तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
….

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close